सारा न्यूज नेटवर्क -
आदिवासी आश्रम शाळा मान्यता रद्द करण्यासाठी आंदोलन..
सोलापूर :- माता स्वरुपाराणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम प्रशाला, वैराग ता बार्शी जि सोलापूर येथे कोणत्याही भौतिक सोयी सुविधा नाहीत, शिक्षक कर्मचारी नाहीत, शासन विहित पद्धतीने पोषण आहार दिला जात नसल्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, पोषणात्मक व संरक्षणात्मक नुकसान होत असल्यामुळे सदर शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव मा.आयुक्तालय नाशिक,मा अपर आयुक्त ठाणे व मा प्रकल्प अधिकारी सोलापूर यांनी सादर केल्याने आदिवासी विकास विभाग प्रधान सचिव मा.विजयकुमार वाघमारे साहेब यांनी ही वरील त्रुटींमुळे शाळा मान्यता रद्द करण्याचा परिपुर्ण प्रशासकीय प्रस्ताव आदिवासी विकास मंत्री महोदय प्रा.डाॅ.अशोक उईके साहेब यांच्याकडे ऑगस्ट 2026 मध्ये सादर केला आहे.
परंतु खान्देश कन्या संस्थेने राजकीय दबाव टाकल्याने आदिवासी विकास मंत्री महोदयांनी प्रचंड त्रुटींयुक्त शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात टाळाटाळ करीत असल्याने सोलापूर येथे आदिवासी संघटनेचे
श्री शाहीर सतिश शिंदे अध्यक्ष व पदाधिकारी क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी पारधी समाज एकता संस्था ढोराळे ता बार्शी जि सोलापूर यांनी दि.23 सप्टेंबर 2026 रोजी सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर धरणे आंदोलन केले.
याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी श्री महेश भोसले, महादेवी शिंदे, रेश्मा भोसले, नाना पवार आदी उपस्थित होते.
आदिवासी पारधी समाज बहुउद्देशीय संस्था सोलापूर चे अध्यक्ष श्री विनायक चव्हाण तसेच श्री विनोद थोरे सर व श्री रामचंद्र धंगेकर सर यांनी धरणे आंदोलनातील मागण्यांना पाठिंबा दिला. तर पिंटू पवार, श्री नकुल चव्हाण, श्री होळीकट्टी आदि समाज बांधवांनी भेटी दिल्या.
अखेर सायंकाळी मा.धनंजय झाकर्डे साहेब प्रकल्प अधिकारी सोलापूर यांनी धरणे आंदोलनातील मागण्यांच्या अनुषंगाने वरीष्ठ कार्यालयास तातडीने कार्यवाहीसाठी कळवत असल्याचे पत्र श्री.आंधळकर साहेब व राख साहेब यांच्या हस्ते देऊन आंदोलना पासून परावृत्त होण्यासाठी प्रयत्न केल्याने अधिका-यांवर विश्वास ठेवत श्री शाहीर शिंदे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन स्थगित केले.






No comments:
Post a Comment