सारा न्यूज नेटवर्क -
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई..!
बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगणारा इसम जेरबंद; १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (दि. २१ ऑक्टोबर २०२६) : सोलापूर शहर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १,२२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. १९/१०/२०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री. अल्फाज शेख व त्यांचे पथक कर्तव्यावर हजर असताना, त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, "विमानतळच्या पाठीमागील रोड ते सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणारे ८० फूट रोडवर, सनराईज शाळेसमोरील मोकळ्या मैदानात, नागनाथ नगर येथे एक इसम त्याचेकडील पांढऱ्या निळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक MH-13-DA-7435 वरून गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेला आहे."
सदर माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक श्री. अल्फाज शेख यांनी वरिष्ठांना कळवून सापळा रचला. बातमीप्रमाणे, सकाळी ११:०० वा. चे सुमारास संशयित इसम हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी, वय - ४९ वर्षे, रा. घर नं. २२, शिवगंगा नगर भाग-१, लिडर हॉटेल जवळ, नई जिंदगी, सोलापूर यास विमानतळाच्या पाठीमागील रोड परिसरातून ताब्यात घेतले.
त्याची व त्याचेजवळ असलेल्या MH-13-DA-7435 मोटारसायकलची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल, पॅण्टचे खिशात ०४ जिवंत काडतुसे तसेच मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये आणखी एक गावठी पिस्तुल असे एकूण दोन गावठी पिस्तुल व चार जिवंत राऊंड असा १,२२,०००/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
चौकशीत त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोहेकॉ १२६६ सचिन महादेव भांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि. नं. ९०३/२०२६ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याचे जवळ मिळून आलेली दोन गावठी पिस्तुल व ४ काडतुसे, पुणे येथील तपासणीसाठी बॅलिस्टिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.
आरोपीवर यापूर्वी ३ गुन्हे दाखल:
आरोपी हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी याचे विरुद्ध एम.आय.डी.सी. येथे शरिराविरुद्धी ०१, महिलाविरुद्धी ०१ असे दोन गुन्हे तसेच जेलरोड पोलीस स्टेशन येथे फसवणुकीबाबत ०१ असे एकूण ०३ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री. प्रीतम यावलकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्री. अरुण देवकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख श्री. अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार राकेश पाटील, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, एकनाथ उबाळे, सचिनकुमार लवटे, सुहास अर्जून, अमर शिवशिंगाले, नागेशसिंह खब्बा, अजित माने, अविनाश दिघोळे, अमोल खरमटमले, सकलैन मुकादम, अस्म्याज बागलकोटे, कुमार बोली, महिला पोलीस अंमलदार दिपाली राठोड यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अल्फाज शेख हे करीत आहेत.


No comments:
Post a Comment