Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 21, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



वेदमूर्ती बसय्या स्वामी संबळ शास्त्री यांची जंगम समाज सोलापूर जिल्हा समन्वयकपदी निवड


सोलापूर : - सिद्धारामेश्वर नगर येथील श्री गिरी मल्लिकार्जुन मंदिराचे सर्वेसर्वा वेदमूर्ती श्री बसय्या स्वामी संबळ शास्त्री यांची जंगम समाजाच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. जंगम समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. श्रवण भैया जंगम यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.


वेदमूर्ती बसय्या स्वामी हे गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. धार्मिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच समाजात एकोपा, बंधुभाव आणि सेवाभाव वाढविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सिद्धारामेश्वर नगर येथील श्री गिरी मल्लिकार्जुन मंदिराच्या माध्यमातून त्यांचे धार्मिक व सामाजिक कार्य सुरू आहे.





डिसेंबर महिन्यात श्री गिरी मल्लिकार्जुन मंदिराची भव्य यात्रा


सिद्धारामेश्वर नगर येथील श्री गिरी मल्लिकार्जुन मंदिराची यात्रा दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या भक्तिभावाने आयोजित केली जाते. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतात. या यात्रेला विविध मठांचे मठाधिपती तसेच अनेक जगद्गुरूंची उपस्थिती लाभते. त्यामुळे या यात्रेला धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.




या यात्रेच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्यासोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य केले जाते. यात्रेचे नियोजन आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बसय्या स्वामी समाजप्रबोधनाच्या कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.


त्यांच्या अनेक वर्षांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत जंगम समाजाच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी झालेली निवड ही त्यांच्या कार्याचा गौरव मानली जात आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


या निवडीबद्दल सिद्धारामेश्वर क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाचे अध्यक्ष शंकर शटगार यांच्यासह दत्तात्रय सनके, गणेश भोजने, बसवराज चीवडशेट्टी, शिवराज कांबळे, मल्लिकार्जून नंदर्गी, नागेश देसाई, अनिल भंडारकवठे, श्रीशैल गवी, जोतिबा खट्याळ यांनी वेदमूर्ती बसय्या स्वामी संबळ शास्त्री यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...




No comments:

Post a Comment