सारा न्यूज नेटवर्क -
ॲडव्होकेट वैभवी सुनील घाडगे यांचा "द गुड पॉलिटिशियन" कार्यक्रमाचा ९ महिन्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण..
Indian School of Democracy
पालघर (प्रतिनिधी) :- ॲड.वैभवी सुनील घाडगे, पालघर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्त्या व भविष्याच्या नेतृत्वाची आशा, यांनी इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी द्वारा आयोजित "द गुड पॉलिटिशियन" या कार्यक्रमाचा ९ महिन्यांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
हा कार्यक्रम भारतभरातून निवडल्या गेलेल्या ५० भावी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन, विविध राज्यांमध्ये निवास आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत, नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी डिझाइन केला आहे. या सहभागींनी नवी दिल्ली, पंजाब, केरळ, कर्नाटक, झारखंड आणि बिहार यांसारख्या राज्यांमध्ये जाऊन स्थानिक पातळीवर सामाजिक व राजकीय कामांचा अनुभव घेतला.
ॲड.वैभवी घाडगे यांनी या काळात महिलांचे सक्षमीकरण, अनुसूचित जाती जमातींचे हक्क, आणि न्यायाधिष्ठित समाजरचनेच्या दिशेने कार्य करत, समाजाभिमुख नेतृत्वाचे उदाहरण सादर केले आहे. त्यांच्या कार्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांच्या विचारांची प्रेरणा लाभलेली आहे.
या कार्यक्रमाने केवळ वैयक्तिक नेतृत्व वाढवले नाही, तर देशभरात सामाजिक बदलासाठी तयार होणाऱ्या नव्या नेतृत्वाला एक दिशा आणि आधार दिला आहे.
ॲड.वैभवी घाडगे यांना त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment