सारा न्यूज नेटवर्क -
उन्हात मुक्या पक्ष्यांसाठी मुठभर धान्य अन् ओंजळभर पाणी...
एकत्व ची सामाजिक बांधिलकी : झाडावर बसविले मातीचे भांडी, कृत्रिम घरटे अन् केले पाण्याची सोय..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दिवसें दिवस वाढणाऱ्या उखाड्याचा तडाखा माणसांबरोबरच पशुपक्ष्यांना जाणून लागला आहे, विशेष पशुपक्ष्यांसाठी कडाक्याचे ऊन मारक ठरत आहे. कडक उन्हाने माणसांबरोबरच पशु पक्षांनाही लाही लाही झाले असून प्रत्येक जण आपापल्या परीने त्यावर उपाय शोधत आहेत. दरम्यान बाळे येथील. एकत्व सोशल फाउंडेशन वाढत्या उन्हात पशुपक्ष्यांना जीवासाठी मूठभर धान्य अन् ओंजळभर हा दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला असून गावागावातील झाडांवर मातीची भांडी, टाकाऊ वस्तु पासून बनवलेले कृत्रिम घरटे पाण्याचीही आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या सोलापूरचे तापमान 41°अंश सेल्सिअस च्या पुढे गेला आहे जो तो उन्हापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत आहे. अशा उन्हाळ्यात माणसाचे जगणं मुश्किल असताना प्राणीमात्रावर काय वेळ येत असेल त्याची कल्पना करणे शक्य नाही म्हणून, एकत्व सोशल फाउंडेशन बाळेच्या वतीने वाढत्या उन्हात पक्ष्यांना मुठभर धान्य आणि ओंजळभर पाणी उपक्रम राबविले बाळे, खेड, गुळवंची, भोगाव, बानेगाव, इत्यादी गावागावात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आले,
या प्रसंगी. राजेश वाघमोडे, राम तोडकर, प्रशांत पाटील, राजेश केकडे, किरण सरवळे, श्रीनाथ श्रीरंग, संघर्ष शिंदे, प्रतीक पाटील, शहाबाज मकानदार, निलेश पाटील दिपक करकी, प्रतीक शिवगुंडे, विरेश माविनमरा इत्यादी उपस्थिती होते..
🔳 झाडावर, अंगणात, गच्चीवर, माळरानात पाणी ठेवा..
*शहरात किंवा ग्रामीण भागात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे सर्वांनी पक्ष्यांसाठी झाडावर, अंगणात, गच्चीवर, खिडकीत जवळ, बागेमध्ये, भिंतीवर, कोपऱ्या, कार्यालयाजवळ, आपापल्या गॅलरीत,इत्यादी ठिकाणी निसर्ग प्रेमींनी नागरिकांनी ओंजळभर पाणी अन् मुठभर धान्य ठेवावे. असे आवाहन एकत्व सोशल फाउंडेशनचे प्रमुख दीपक करकी यांनी केले आहे..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment