सारा न्यूज नेटवर्क -
सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ह.भ.प. डॉ.श्रीगुरू जयवंत महाराज बोधले यांची "कर्मयोग" या विषयावर प्रवचन माला..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठान, सोलापूर व समस्त सोलापूरकर यांच्या वतीने सोमवार, दिनांक १४/०४/२०२५ ते बुधवार, दिनांक १६/०४/२०२५ तीन दिवशीय प्रवचन माला महाराष्ट्रातील नामवंत धर्मग्रंथाचा गाढा अभ्यास असणारे ह. भ. प. डॉ. श्रीगुरू जयवंत महाराज बोधले, संत माणकोजी महाराज बोधले यांचे विद्यमान वंशज यांची "कर्मयोग" या विषयावर प्रवचन माला निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिरशेजारी, सोलापूर येथे सायंकाळी ०६.०० ते ०८.०० या वेळेमध्ये आयोजित केलेले आहे.
सध्याच्या पिढीला सुसंस्कृतपणा, आचार-विचार टिकविण्यासाठी व संत संगतीचे महत्त्व विशद करण्यासाठी या प्रवचनमालेचे आयोजन केलेले आहे. तरी सोलापूर व जिल्ह्यातील सर्व भाविकांनी, वारकऱ्यांनी, नागरिकांनी या प्रवचन मालेचा लाभ घ्यावा ही विनंती.
सदर पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे किसन बापु कापसे, संजय पवार, अनिल देठे, निवृत्ती माने, राजु माने, मल्लु म्हेत्रे, अजय आसबे, प्रकाश पवार आदि उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment