सारा न्यूज नेटवर्क -
माकप कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन....
सोलापूर(प्रतिनिधी) :- दिनांक 14 एप्रिल - महामानव बोधिसत्व भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲड कॉ.एम एच शेख यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्या माजी नगरसेविका कॉ.कामिनी आडम व कॉ. रंगप्पा मरेड्डी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर पार्क चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात अभिवादन करण्यात आले. तसेच माकप ची पक्ष शाखा कोणापुरे चाळ येथे माकपचे राज्य समिती सदस्य कॉ.ॲड अनिल वासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी युवा महासंघाचे राज्य सचिव कॉ.दत्ता चव्हाण, सचिव मंडळ सदस्य कॉ.व्यंकटेश कोंगारी, कॉ सुनंदा बल्ला, प्रा.अब्राहम कुमार, दीपक निकंबे, अकील शेख,बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसूरे ,मल्लेशाम कारमपुरी, अशोक बल्ला, नरसिंग म्हेत्रे, पांडुरंग म्हेत्रे, चंद्रकांत मंजुळकर, सनी आमाटी, अरुण सामल ,ॲड.शाम आडम , प्रदीप मरेड्डी,मोहन कोक्कुल, प्रकाश कुऱ्हाडकर,अंबादास बिंगी, विजय मरेड्डी आदीसह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment