सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार सतीश गडकरी यांचा सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी ):- गेली दहा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र राजकीय सामाजिक व शैक्षणिक बाबत च्या ताज्या घडामोडी तसेच समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आवाज उठवला आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीने साप्ताहिक कार्यसम्राट ने आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून सोलापूर शहरातील जेष्ठ पत्रकार सतीश गडकरी यांची सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून नुकतीच फेर नियुक्ती केली होती त्यांचा पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार जिल्हा संघटक सादिक शेख दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान नितीन साठे साप्ताहिक कार्यसम्राट चे अमर पवार बंडू तोडकर राजू वग्गू लक्ष्मण सुरवसे जैद बागवान शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) सोहेब बागवान इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment