Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, April 26, 2025

भारतीय कामगार सेनेची तळेगाव दाभाडेच्या वैद्यकीय महाविद्यालय येथे नवी शाखा स्थापन..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

भारतीय कामगार सेनेची तळेगाव दाभाडेच्या वैद्यकीय महाविद्यालय येथे नवी शाखा स्थापन.. 


तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) :- गुरुवार, दिनांक २४ एप्रिल २०२५  पुणे जिल्ह्यातील प्रगतशील अशा तळेगाव दाभाडे मावळ,परिसरातील मायमर मेडिकल कॉलेज व डॉक्टर बी एस टी आर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे भारतीय कामगार सेनेची आज शाखा स्थापन झाली.

यावेळी बोलताना भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शिवसेना उपनेते मा.राज्यमंत्री डॉ. कुचिक म्हणाले, "तळेगावातील मायमर कॉलेज किंवा हॉस्पिटल हे काही धर्मदाय हॉस्पिटल नाही. येथील मॅनेजमेंट व्यापारी दृष्टिकोन ठेवून हॉस्पिटल चालवत आहेत.  येथील कर्मचारी हे सर्व उच्च शिक्षित आहेत.  वेळ पडली तर एक तास जास्त काम करून हे लोक हॉस्पिटलला मदत करतील. 


परंतु हॉस्पिटल काही वैद्यकीय समाजसेवा करीत नाही. व्यापारी दृष्टिकोन ठेवून ते हॉस्पिटल चालवत आहेत. आतापर्यंत व्यवस्थापन या कर्मचाऱ्यांना  फसवत आले आहे. यापुढे ही फसवणूक होणार नाही. याची काळजी कामगार सेना नक्की घेईल."


 ते म्हणाले,मला अनेक वर्षे हॉस्पिटल उद्योगाचा प्रत्यक्षात अनुभव आहे येथे मी रुग्णालयातील कामकाज जवळून पाहिले आहे. त्यामुळे हॉस्पिटल व वैद्यकीय कॉलेज याच्या संदर्भात मला थोडी अधिक माहिती आहे.'


यावेळी सेनेच्या नाम फलकाचे अनावरण डॉ.श्री रघुनाथ कुचिक यांच्या शुभ हस्ते झाले.

हॉस्पिटलच्या आस्थापनात असलेला टी जी एच रिक्रेशन हॉल या ठिकाणी द्वार सभा पार पडली. यावेळी पुरुष महिला परिचारक परिचारिका टेक्निशियन वॉर्ड बॉय  मावशी सफाई व इतर कर्मचारी यांना मा. कुचिक साहेब यांनी मार्गदर्शन केले. 

दाभाडे राजे सरकार यांच्या जागेवर समाजाची सेवा करण्यासाठी ह्या हॉस्पिटलचे निर्माण झाले होते परंतु तो उद्देश व्यापारीकरणाच्या स्पर्धेत मागे पडला आहे. व्यवस्थापन जर व्यापारी दृष्टिकोन ठेवून अर्थकरण करत असेल तर माझ्या गरीब एज्युकेटेड कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी अवश्य लढा देणार आहे.




     काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर त्यांचे न्याय हक्क व्यवस्थापनाने जर दिले नाही तर आंदोलन किंवा संघर्ष आम्हाला नवीन नाही शिवसेनेच्या मुशीतून व बाळासाहेबांच्या कुशीतून आम्ही शिकलेलो आहे. असा सज्जड दम व्यवस्थापनाला देण्यास ते विसरले नाहीत. कुचिक साहेबांच्या मार्गदर्शनाने येथील सर्व कर्मचारी वर्ग प्रभावित झाला. बऱ्याच वर्षातून त्यांच्या चेहऱ्यावर हे हास्य फुलले. नाम फलकाचे अनावरण करणे अगोदर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश गौरी" यांची भेट घेऊन आमची संघटना या ठिकाणी कशा पद्धतीने कामकाज करेल, हे साहेबांनी निक्षून सांगितले.या कार्यक्रमाला सौं याज्ञसेन सतेंद्र राजेदाभाडे सरकार, शिवसेना तळेगाव शहर प्रमुख श्री.शंकर भेगडे साहेब भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस कार्यकारणी सदस्य व पंचक्रोशीतील सर्व कामगार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिट अध्यक्ष सौ मीरा फड यांनी केले व आभार कार्यक्रम युनिट सहसचिव संगीता घोडके यांनी केले. 


या कार्यक्रमासाठी कॉलेज व हॉस्पिटलचे सर्व युनियन पदाधिकारी सचिव "श्री सुभाष चव्हाण" श्री परमार साहेब  आर.पी.आय शहराध्यक्ष श्री संदीपजी शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. तळेगाव दाभाडे सारख्या शहरांमध्ये एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये या कराल काळामध्ये भारतीय कामगार सेना मा.कुचिक साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ही भारतीय कामगार सेना व शिवसेना ( उ बा ठा ) यांना नव संजीवनी व नवचैतन्य देणारी ठरली.... अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment