Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, April 9, 2025

68 वर्षांच्या वृद्धाने शाळेतील मुलींसमोर अश्लील कृत्य केले, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल ;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

68 वर्षांच्या वृद्धाने शाळेतील मुलींसमोर अश्लील कृत्य केले, 

पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल ;

४८ तासांत तपास पूर्ण करणार : पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत

सोलापूर (प्रतिनिधी) : - शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ६८ वर्षाच्या वृद्धावर जेलरोड पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे.

यलप्पा कुंचीकोरवे (वय ६८, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता यल्लप्पा याने घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलींना बोलावून घेतले. जवळ घेऊन पैशांचे आमिष दाखवले. त्यांना त्याने घरी येण्यास सांगितले. शिवाय मुली शाळेवरून घरी जात असताना, तो रस्त्यावरील घराशेजारी असलेल्या बोळात थांबला. मुली रस्त्यावरून घरी जात असताना, त्यांना पाहून अश्लील चाळे करीत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यामुळे मुली घाबरल्या त्यांनी मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने मुलींच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिका व पालकांनी जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला, पोलिसांनी तत्काळ मुख्याध्यापिकेची फिर्याद घेतली. यलप्पा कुंचीकोरवे याला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९ व पोक्सो १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

४८ तासांत तपास पूर्ण करणार : शिवाजी राऊत

तीन मुलींबाबत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे, वृद्धावर गुन्हा दाखल झाला असून ४८ तासांत तपास पूर्ण करणार आहोत. दोषारोपपत्र सादर करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment