सारा न्यूज नेटवर्क -
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सोलापुरचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक खेळाडू दत्ता वरकड व नूतन पोलीस उपनिरीक्षक अक्षय कंदी यांचा सत्कार..
खेळ व अभ्यासातील सातत्याने उच्चपदस्थ अधिकारी होता येते : दत्ता वरकड
सोलापूर (प्रतिनिधी : - नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर "विराट स्पोर्ट्स अकॅडमी" च्या वतीने सोलापुरातील दोन सुपुत्र जे खेळामुळे उच्चपदस्थ अधिकारी झाले, असे आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक खेळाडू मा. दत्ता वरकड व नूतन पोलीस उप निरीक्षक मा.अक्षय कंदी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला...
या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झालेले सोलापूरचे सुपुत्र मा.दत्ता वरकड हे बोलत होते...
मा.दत्ता वरकड व नूतन पोलीस उपनिरीक्षक मा.अक्षय कंदी हे दोन्ही खेळाडू विराट स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मा.सूर्याजी लिंगडे यांचे विद्यार्थी आहेत...
अकॅडमीच्या वतीने कबड्डी राज्य पंच मा.सुभाष माने व शहर भाजप क्रीडा प्रकोष्ट मा.यशवंत पाथरूट व सामाजिक कार्यकर्ते मा.विशाल गायकवाड यांच्या शुभहस्ते पुष्पहार, शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...
यावेळी जिल्हा क्रीडा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दत्ता वरकड यांनी उपस्थित खेळाडू व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना खेळ व शिक्षणातील सातत्य ठेवलो तर आपल्यालाही अशा प्रकारे उच्चपदस्थ अधिकारी होता येते आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले...
तसेच नूतन पोलीस निरीक्षक मा.अक्षय कंदी यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शारीरिक कसरती बरोबर लेखी परीक्षेचे तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले...
प्रारंभी कबड्डी राज्य पंच मा.सुभाष माने यांनी मनोगत व्यक्त केले...
तसेच क्रीडा मार्गदर्शक व एन.आय.एस. कोच मा.सूर्याजी लिंगडे यांनी दोन्ही खेळाडूंना घडवितानाचे काही संस्मरणीय आठवणी मुलांसमोर व्यक्त केल्या...
यावेळी जॉगर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष मा.संतोष कदम यांनी आभार व्यक्त केले...
यावेळी विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका व एन.आय.एस. कोच मा.भारती लिंगडे,पोलीस हवालदार मा.महेश थोरात, मा.चांगुणाबाई लिंगडे व बहुसंख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment