Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 6, 2025

भाजपा ध्येयधोरणांस अनुसरून चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराचं काम - नरेंन्द्र काळे

 


सारा न्यूज नेटवर्क - 

भाजपा ध्येयधोरणांस अनुसरून चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराचं काम - नरेंन्द्र काळे 

सोलापूर (प्रतिनिधी) :- ०६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिवस आणि प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराने पाणपोई सुरू करून स्थापना दिवस साजरा केला हे खुप कौतुकास्पद आहे. आपुलकीचं नातं आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी कार्य चन्नवीर चिट्टे मित्र परिवार करत असतो याचा खुप आनंद आहे. 



त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी न चुकतां भाजपा स्थापना दिनी पाणपोई सुरू करण्याची परंपरा याहीवर्षी जपली. भाजपाला लोकसेवेचा वारसा आहे आणि तोच वारसा चन्नवीर चिट्टे मित्र परिवार चालवत आहे असे उद्गार भाजपाचे शहर अध्यक्ष नरेन्द्र काळे यांनी काढले. भवानीपेठ येथील पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने भाजपा स्थापना दिनी सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यात्मिक गुरू मा. अण्णाराव महाराज होते. यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, शहर उपाध्यक्ष अनिल कंदलगी, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष राम वाकसे, सागर अतनुरे, विजय कटके, हॅाटेल व्यावसायिक नितीन शेजूळ, व्यापारी श्रीनिवास कणकी, अमित बोगा ,सतीश कंटीकर ,नागेश जोगधंकर ,मयुर लंगोटे ,अंबादास चिरलंची यांची विशेष उपस्थिती होती. 



या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण करजगी, पप्पू क्षीरसागर , श्रीनिवास दासरी, गुरूनाथ कोळी, किरण वल्लाल, सद्दाम कोसगीकर, महेश हलसगी, रवि शहापूरकर, रेवणसिद्ध बिराजदार, ओम जमादार , राहुल गंगशेट्टी, सोमनाथ कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment