Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 7, 2025

जालन्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून अत्याचार...! कदीम जालना पोलिसांनी प्रियकरांच्या आवळल्या मुसक्या,

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जालन्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून अत्याचार...!

 कदीम जालना पोलिसांनी प्रियकरांच्या आवळल्या मुसक्या,

जालना (प्रतिनिधी) संभाजी पुरीगोसावी:-   जालना शहरांत एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आईच्या प्रियकरांकडून या चिमुकलीवर हा अत्याचार करण्यात आलेला आहे. जालना कदीम पोलिसांनी प्रियकरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रशांत प्रकाश वाडेकर असे या आरोपींचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यांतील एक 28 वर्षीय महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून. ती जालना शहरांतील एका भागात भाड्याच्या घरात राहत होती. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यापैकी एक मुलगा व मुलगी पत्नीकडे जिंतूर येथे राहतात. तर सहा वर्षाची मुलगी मुलीसोबत ती राहत होती. सदर महिला घरगुती काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती.   आणि याच महिलेची ओळख एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून ती महिला प्रशांत वाडेकर यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांचेही प्रेमात रूपांतर झाले होते, सदर महिलाही ही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  रोज कामासाठी बाहेर पडत होती. दुपारपर्यंत ती घरात नसायची, यावेळी तिचा प्रियकर प्रशांत वाडेकर हा दिवसभर घरी असायचा यावेळी तिची मुलगी घरी होती. घरात कोणी नाही, याचा गैरफायदा घेत प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर घरात असताना तो तिच्यावर अत्याचारांची संधी साधत होता. या सर्व गोष्टींचा त्या मुलीला त्रांस होऊ लागल्याने तिला ताप आणि उलट्या होत्या... अखेर रात्री घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आईला सांगितला यावेळी आईच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर मुलीच्या आईने जालना कदीम पोलीस ठाणे गाठले, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अखेर जालना कदीम पोलिसांनी प्रशांत प्रकाश वाडेकर या प्रियकरांच्या मुसक्या आवळल्या.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment