सारा न्यूज नेटवर्क -
ऑनलाइन V.D.O. गेम वर कायमची बंदी घालण्यात यावी;
विश्वनाथ खटावकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्वनाथ खटावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की,
वरील विषयी आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, सध्या टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या काही जाहिरातीमध्ये नागरिकांना जुगार खेळण्यासाठी प्रेरित केले जात असल्याचे आम्ही पाहतो आहे. तसेच सध्या बहुतांश नागरिकांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. तसे पाहता सदर अँड्रॉइड मोबाईलचा वापर योग्य रीतीने चांगल्या कामासाठी केल्यास ज्ञानामध्ये भर पडते. तसेच त्याचा योग्य रीतीने उपयोग करून अनेकांनी स्वतःची प्रगती केल्याचे सुद्धा आम्ही ऐकत आहोत. परंतु अनेक नागरिक झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने या मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळतात अशा खेळात श्रीमंत होणे तर दूरच परंतु स्वतःजवळ असलेली पुंजी, जमीन, घरे, शेती सुद्धा असे खेळ खेळणारे वाचवू शकले नाहीत. म्हणजेच अनेक जण या खेळामुळे स्वतः जवळ असलेली मालमत्ता विकून बरबाद (कफल्लक) झाल्याचे आमच्या ऐकण्यात व पाहण्यात येते आहे.
तरी महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवन उध्वस्त करणारे असे व्हिडिओ गेम चालवून अनेकांना देशोधडीस लावणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने कठोर कारवाई करावी. तसेच सर्व प्रकारच्या व्हिडिओ गेम वर कायमची बंदी घालण्यात येऊन अशा प्रकारास बळी पडण्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण करण्यात यावे असे आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपणास विनंती करतो आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment