सारा न्यूज नेटवर्क -
सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी ;
चोरीला गेलेल्या चार दुचाकी केल्या हस्तगत, तीन जण पोलिसांच्या ताब्यात...!
सातारा (प्रतिनिधी) संभाजी पुरी गोसावी :- सातारा तालुका पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून प्रभारी अधिकारी निलेश तांबे हे नेहमीच प्रयत्नशील, सातारा तालुका पोलीस ठाणेचा कार्यक्षेत्र हे मोठे आहे, सातारा तालुका पोलिसांनी दमदार कारवाई करत चोरीला गेलेल्या चार दुचाकी हस्तगत करीत यामध्ये तीन जणांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सातारा तालुका पोलीस ठाणेत चार दुचाकी चोरीला गेल्या बाबतचे गुन्हे दाखल होते, त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले सातारा तालुका प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी पोलीस ठाणेकडील डी.बी पथकाला सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने गोपनीय माहिंतीच्या आधारे हे तीन संशयित चोरी केलेल्या दुचाकीची विक्रीसाठी लिंब या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती डी.बी पोलिसांना मिळाली होती. लिंब (ता.सातारा ) या ठिकाणावरून तीन संशयितांना दुचाकीची चोरी करून घेवुन गेल्याची कबुली पोलिसांना दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या एक लाख दहा हजार रुपये असून सदर चोरी झालेल्या दुचाकीचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाणेकडील डी बी पथकांने अखेर उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकांचे स.पो.नि. विनोद नेवसे पोलीस हवालदार दादा स्वामी शिखरे महिला पोलीस हवालदार गायकवाड पोलीस नाईक प्रदीप मोहिते पो .कॉ. संदीप पांडव धीरज पारडे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, सातारा तालुका पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment