सारा न्यूज नेटवर्क -
सत्याच्या प्रकाशासाठी लेखणी हाती घेणारा लढवय्या –
सचिन बापू खरात यांची सारा न्युज नेटवर्कच्या मुंबई प्रतिनिधी पदी वर्णी..
मुंबई (प्रतिनिधी) :- समाजातल्या दुर्लक्षित, आवाज दाबल्या गेलेल्या आणि अन्यायग्रस्त घटकांसाठी, आपल्या लेखणीतून सत्याचा लढा देणारे, माहितीचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचवणारे, आणि मानवाधिकारांची जाणीव जनतेमध्ये निर्माण करणारे मा. श्री. सचिन बापू खरात यांची “सारा न्युज नेटवर्क” या विश्वासार्ह व लोकाभिमुख मीडिया संस्थेच्या मुंबई प्रतिनिधी पदावर निवड झाल्याची अत्यंत आनंददायक व अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.
ही निवड म्हणजे केवळ एक पद नाही, तर सत्यशोधन आणि जनजागृतीच्या मार्गावर चालणाऱ्या त्यांच्या वाटचालीची अधिक मजबूत दिशा आणि व्यापक व्यासपीठ आहे.
संपादक मा. श्री राम हुंडारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी श्री. खरात यांच्याकडे सोपवण्यात आली असून, हे नेतृत्व त्यांच्या सामाजिक बांधिलकीला व पत्रकारितेतील सचोटीला मिळालेलं बळ आहे.
श्री. सचिन खरात यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत:
• प्रसिद्धी प्रमुख – गुरू रविदास स्वाभिमानी युवा संघ
• सदस्य – पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
• मुंबई अध्यक्ष – RTI Human Rights Activist Association
• रिपोर्टर – RTI Times Press Media
• संवाद प्रमुख – माहिती प्रसारण व्हाट्सअप जनजागृती समूह
त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये समाजासाठी झगडण्याची, सत्य मांडण्याची आणि लोकांच्या हक्कासाठी प्रश्न उपस्थित करण्याची आक्रमकता होती. आता ते “सारा न्युज नेटवर्क” च्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील प्रश्न, अन्याय, जनतेच्या मागण्या व यथार्थ परिस्थिती अधिक तीव्रपणे समोर आणतील, अशी ठाम आशा आहे.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचं साधन नसून ती समाज परिवर्तनाची मशाल असते, हे खरात साहेबांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि पुढील जबाबदारीसाठी गुरू रविदास स्वाभिमानी युवा संघ परिवार आणि सर्व सहकाऱ्यांच्यावतीने कोटी कोटी शुभेच्छा! 💐💐
“लेखणीची धार आणि सत्याचा वसा घेऊन, समाजासाठी लढणाऱ्या खरात साहेबांना सलाम!”
शब्दांकन - दिपक खोपकर
संस्थापक अध्यक्ष - गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ महाराष्ट्र
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment