Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, April 17, 2025

लेटेस्ट न्यूज चे संपादक अशपाक शेख यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय विशेष आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..

 




सारा न्यूज नेटवर्क - 

लेटेस्ट न्यूज चे संपादक अशपाक शेख यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय विशेष आदर्श पत्रकार पुरस्कार  जाहीर.. 

सोलापूर (प्रतिनिधी ):- गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे  त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या  व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा  विशेष आदर्श युवा संपादक म्हणून 

 अशपाक शेख यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी  दिली  आहे.


लेटेस्ट न्यूज चे संपादक अशपाक शेख यांचा परिचय

 पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्यायहक्कासाठी लेटेस्ट न्यूज च्या माध्यमातून संपादक अशपाक शेख यांनी प्रशासन दरबारात आवाज काढून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी आवाज उठवला असून लेटेस्ट न्यूज च्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय घडामोडीचा वेगवान आढावा घेऊन समाजासमोर लेटेस्ट न्यूज ने एक नवा आदर्श निर्माण केला असून पत्रकारिता हे केवळ जगण्याचे साधन नसून समाजाचा आरसा आहे लेटेस्ट न्यूज च्या बातमीची दखल घेऊन अनेकांना न्याय मिळाला असून लेटेस्ट न्यूजच्या कार्याची दखल घेऊन संपादक अशपाक शेख यांना पत्रकार सुरक्षा समिती मानाचा राज्यस्तरीय  2025 चा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment