सारा न्यूज नेटवर्क -
युवा पत्रकार गणेश कारंडे यांना पत्रकार सुरक्षा समितीचा (2025) राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श युवा पत्रकार म्हणून अकलूज (माळशिरस ) येथील पोलीस तपास वृत्त पत्रा चे युवा पत्रकार गणेश कारंडे यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली आहे. गणेश कारंडे यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेचे प्रश्न आपल्या वृत्तपत्रा च्या माध्यमातून मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला असून सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत धावून जाणारे पत्रकार म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या कार्याची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेतली असून युवा पत्रकार गणेश कारंडे यांना पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment