Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 7, 2025

लावण्यवंती गौतमी पाटील हिचा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा -- सौ. प्रतिभा सुनील शेलार

 


सारा न्यूज नेटवर्क - 

लावण्यवंती गौतमी पाटील हिचा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा  -- सौ. प्रतिभा सुनील शेलार 

सातारा (प्रतिनिधी) संभाजी पुरीगोसावी :-  साताऱ्यातील शेंद्रे येथील अजिंक तारा सांस्कृतिक भवन येथे अश्लील डान्स करणारी लावण्यवंती गौतमी पाटील हिचा कार्यक्रम रद्द करण्याबाबत 

               सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्यातील सर्व नागरिकांची इच्छा आहे की सातारा हा अश्लील मुक्त सातारा झाला पाहिजे त्यामुळे तीन वर्षांपूर्वी गौतमी पाटील हिचे अश्लील डान्स करण्याविरुद्ध सातारा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे तसेच अनेक ठिकाणी निवेदनही दिले आहेत की वारंवार तक्रार देऊन सुद्धा अश्लील डान्स करणारी गौतमी पाटील किंवा तिच्यासारखी अश्लील डान्स करणारी कोणतीही डान्सचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात होऊ नये असे निवेदन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच सातारा तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे,   सातारा जिल्ह्यामध्ये व तालुका हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये दिले आहे, गेल्या तीन वर्षांमध्ये अश्लील डान्स गौतमी पाटील हिचे कार्यक्रम कमी प्रमाणात झाले आहेत वारंवार तक्रार दिलेली आहे, 

   तरीसुद्धा पोलीस प्रशासन त्यांचे कार्यक्रम रद्द करत नाहीत आणि हे कार्यक्रम घेणारे राजकारणी, आमदार, मंत्री व त्यांचे कार्यकर्तेच असतात त्यामुळे पोलीस प्रशासन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नाकारतात तरीसुद्धा तो कार्यक्रम होत असतो अशातच अश्लील डान्स गौतमी पाटील हिचा डान्स बघण्यासाठी 2000 ते 3000 पुरुष व युवा पिढी येत असतात, आणि ती सर्व पुरुष मंडळी अश्लील डान्स बघून विकृत मानसिकतेचे शिकार होतात व त्यांना शारीरिक संबंध करण्याची इच्छा होते, अशातच असे पुरुष महिला मुली व अल्पवयीन मुली व अल्पवयीन मुलांवर विनयभंग,बलात्कार, शोषण व अत्याचार करतात त्यामुळे असले अश्लील डान्स करणारे कार्यक्रम तात्काळ रद्द करावा, 

  तसेच 11 एप्रिल रोजी आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमिंत्ताने 31 मार्च रोजी होणारा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी घेण्यात येत आहे, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे निकटवर्तीय एडवोकेट विक्रम पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत, त्यामुळे असे अश्लील डान्स होऊ नयेत व हा कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यासाठी आपण परवानगी द्यावी, 

     आणि समाजामध्ये व साताऱ्यामध्ये पुरुष वर्ग विकृत मानसिकतेचे शिकार न होण्यास सहकार्य करावे अन्यथा असले कार्यक्रम होत राहतील आणि गुन्हेगारी मध्ये बलात्कार आणि विनयभंग अत्याचार व शोषण या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते सध्याचा आकडा बघितल्यानंतर दररोज वाढत चालला आहे.

   त्यामध्ये विक्रम पवार यांनी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम महिला मेळावा म्हणून घेत आहे. त्या कार्यक्रमांत महिलाच येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे महिला सुद्धा पुरुषांवर बलात्कार करतात अत्याचार करतात शोषण करतात ही बाब आपण आणि सर्व समाजातील लोकही लक्षात ठेवत आहेत कारण सध्याची परिस्थिती बघितली तर महिलांकडून पुरुषांवर होणारे अत्याचार हे अतिप्रमाणात वाढलेलेच आहेत आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक संबंध त्यामुळे हा कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यासाठी आपण परवानगी द्यावी आणि माझ्या निवेदनाची दखल घेवुन आपला ऐतिहासिक जिल्हा हा 

अश्लील मुक्त व्हावा आणि आमच्या या मोहिमेला सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे या निवेदनात म्हटले आहे. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment