Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 29, 2025

मोठी बातमी : मावळ तालुका कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी पुन्हा अंकुश आंबेकर..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 मोठी बातमी : मावळ तालुका कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी पुन्हा अंकुश आंबेकर.. 

    मावळ (प्रतिनिधी) :-  मावळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे मा.अध्यक्ष पुणा पिंपल्स बॅकेचे विद्यमान अध्यक्ष तालुक्याचे जेष्ठ नेते बबनराव भेगडे  तसेच तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापुसाहेब भेगडे यांचे खंदे ( Maval) समर्थक अंकुशराव रामचंद्र आंबेकर यांची  तर उपाध्यक्षपदी भरत गरुड, छबुराव गायकवाड ,सुरेश जाधव , संतोष कुंभार ,अन्वर इब्राहिम सिलीकर यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली. अंकुशराव रामचंद्र आंबेकर यांची ग्रामोद्योग संघावर पाचव्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 



       यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष संतोष मु-हे,खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले,टाकवे ग्रामपंचायत मा.सदस नवनाथ आंबेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार, संचालक  विलास मानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच नाथा झांबरे,भाजपा सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, श्री पोटोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव अनंता कुडे,



 शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अतुल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संत रोहिदास समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रमेश मानकर संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट चे तालुकाध्यक्ष दिनेश जाधव आळंदी ट्रस्ट चे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, तालुका ट्रस्ट चे संस्थापक अशोक मानकर,संजय शिळवणे, उपाध्यक्ष रूपचंद गायकवाड , ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे, निवृत्ती शिंदे, प्रकाश कदम,दत्ता शिंदे,दिलीप आंबेकर, साहेबराव आंबेकर बापु शिळवणे,अक्षय शिंदे,अनिकेत आंबेकर 


तसेच महिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष आंबेकर व उपाध्यक्ष गरुड  यांचा सत्कार करण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

               


अकरा जागांवर संचालकांची बिनविरोध निवड झाली.. 

मावळ तालुका कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघ मर्या., वडगाव (ता. मावळ) ची सन २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

 यात अकरा जागांवर संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज, सोमवारी (दि. २८ एप्रिल २०२५ ) संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक होणार होती.

  



       त्यानुसार सोमवारी, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या *चेअरमन* पदी *अंकुशराव रामचंद्र आंबेकर* यांची तर व्हा.चेरमन भरत गरुड यांची बिनविरोध निवड झाली. *अंकुशराव रामचंद्र आंबेकर* यांची खादी ग्रामोद्योग संघावर पाचव्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

    श्री आंबेकर व श्री गरुड यांच्या निवडीमुळे तालुक्यामध्ये त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.




     अकरा संचालक यादी - 

1. साहेबराव तुळशीदास मोहिते (खनिज आधारित उद्योग)

2. सुरेश धोंडीबा जाधव (वनावर आधारित उद्योग)

3. भरत गणपत गरूड (कृषी आधारित व खाद्य उद्योग)

4. अंकुश रामचंद्र आंबेकर (पॉलीमर व रसायन आधारित उद्योग)

5. छबुराव चिंधू गायकवाड (अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जा)

6. चंद्रकांत निवृत्ती दाभाडे (वस्त्रोद्योग व सेवा उद्योग)

7. भावना सुभाष ओव्हाळ (महिला प्रतिनिधी)

8. कल्पना अनिल भोर (महिला वाह)

9. अमित पांडुरंग ओव्हाळ (अनुसुचित जाती/जमाती)

10. संतोष दगडू कुंभार (इतर मागास वर्ग)

11. अन्वर इब्राहिम सिलीकर (भ.ज/विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग)

सारा न्युज नेटवर्क

 मावळ प्रतिनिधी - रमेश मारूती शिंदे

 ७७९८९९७२३८

No comments:

Post a Comment