Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, April 16, 2025

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांना 1034 वहयाचे वाटप.....


 सारा न्यूज नेटवर्क - 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांना 1034 वहयाचे वाटप.....

सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना1034 वह्या वाटप करण्यात आले. प्रथमता बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. 





त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 1034 वह्याचे वाटप करण्यात आले यावेळी गिरीधर थोरात, श्रीकांत बोराडे, अनिल उकरंडे व संस्थापक अध्यक्ष आदर्श भैय्या धडे, नागेश दासरी, नाना रामपुरे, रमाकांत वाघमारे, संतोष पवार, तिरुमल घोडके, संस्थेचे मार्गदर्शक शशिकांत उकरंडे, नंदकिशोर दिडवाणी, बाळासाहेब लोंढे, अनिल घुमले आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते. तसेच यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान तर्फे मान्यवरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण असलेले पुस्तक देण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment