सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी दैनिक पोलीस तपास चे गणेश कारंडे यांची नियुक्ती...
पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करणार - गणेश कारंडे
सोलापूर(प्रतिनिधी ):- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाची अट आठवी पास करणे पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
*युवा पत्रकार गणेश कारंडे यांचा अल्प परिचय*
युवा पत्रकार गणेश कारंडे हे श्रीपुर तालुका माळशिरस येथील असून गेले अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करीत असून दैनिक पोलीस तपास या वृत्तपत्राचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत समाजातील वंचित पिढीत घटका च्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणी च्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त त्याच बरोबर शोषित व दुर्बलांच्या मदतीला युवा पत्रकार गणेश कारंडे नेहमीच धावून जातात माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात नेहमीच मांडून युवा पत्रकार म्हणून गणेश कारंडे यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या धडाकेबाज पत्रकारितेची पत्रकार सुरक्षा समिती ने दखल घेऊन युवा पत्रकार गणेश कारंडे यांची पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती केली युवा पत्रकार गणेश कारंडे यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश संघटक गणेश जाधव प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिरझा गालिब मुजावर मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ रायगड नवी मुंबई अध्यक्ष राज भंडारी अहिल्यानगर अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment