सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे प्रदेश प्रवक्ता जेष्ठ पत्रकार शिंदखेडा प्रतिनिधी येथील यादवराव सावंत यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या राज्य सदस्यपदी निवड..
उल्हासनगर (प्रतिनिधी) :- हिंदी मराठी मराठी पत्रकार संघ दिल्ली राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना असुन नुकतीच राज्य कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली त्यात खान्देशातुन शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांची बिनविरोध राज्य सदस्यपदी निवड सर्वानुमते करण्यात आली.
श्री. सावंत गेल्या तीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची महत्वाची भुमिका असते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत जिल्हा, राज्यस्तरावर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले आहे. आतापर्यंत पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत शंभर हुन अधिक तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सर्वाना समान न्याय पत्रकार क्षेत्रातुन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची हिंदी मराठी पत्रकार संघात राज्य सदस्य पदावर निवड केली आहे.
सदर निवडीबद्दल संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सावंत सर यांचा येत्या १३ तारखेच्या वारुड शाखा फलक अनावरण सोहळा कार्यक्रमात त्याचा सन्मान चिन्ह प्रमाणात देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन लिंबोरे साहेब यांनी जाहीर केले व अभिनंदन केले आहे सर्वत्र स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment