सारा न्यूज नेटवर्क -
महावितरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
सोलापूर (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात, आनंदी व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, मेहबुब बागवान, निलकंठ कांबळे, अनिलकुमार बनसोडे, धुळाप्पा टेळे, अमोल धायगुडे, गुंडप्पा बनसोडे, प्रदीप मुलादे, संभाजी रुपनर, मल्लिनाथ मुन्नोळी, चंद्रकला शिंदे, हिना बागवान व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment