Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, October 26, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



दहिवडी कॉलेजचे प्रा. डॉ. आनंद देडे यांना फिश स्पॉन कलेक्शन डिव्हाईससाठी भारत सरकारचे पेटंट


दहिवडी / प्रतिनिधी


दहिवडी कॉलेज, दहिवडी येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. डॉ. आनंद नवनाथ देडे यांना नुकतेच भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून "फिश स्पॉन कलेक्शन डिव्हाईस" या संशोधन विषयावर पेटंट प्राप्त झाले आहे.


प्रा. डॉ. देडे यांना यापूर्वीही प्राणिशास्त्र विषयात विविध संशोधनांसाठी पेटंट मिळाले असून, त्यांच्या संशोधन कार्याची ही आणखी एक महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.


त्यांनी विकसित केलेले हे स्पॉन कलेक्शन डिव्हाईस मत्स्यपालन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मत्स्यपालन (Aquaculture), माशांचे प्रजनन (Fish Breeding) आणि हॅचरी (Hatchery) व्यवस्थापनामध्ये स्पॉन कलेक्शन डिव्हाईस हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे.



सामान्यतः माशांचे बीज, अंडी व बारीक पिल्ले सुरक्षितपणे गोळा करण्यासाठी एग कलेक्टर नेट, ओव्हरफ्लो टँक, हापा नेट यांसारख्या उपकरणांचा वापर केला जातो. डॉ. देडे यांनी विकसित केलेल्या नव्या डिव्हाईसमुळे मासळीचे बीज अधिक सुरक्षित, कमी मनुष्यबळात आणि कमी नुकसानीत गोळा करणे शक्य होणार असून, याचा थेट फायदा मत्स्य बीज उत्पादक शेतकरी आणि हॅचरी व्यावसायिकांना होणार आहे.


या पेटंटमुळे मत्स्यबीज संकलनाची कार्यक्षमता वाढून मत्स्य उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.


या यशाबद्दल दहिवडी कॉलेजचे प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ, तसेच प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून प्रा. डॉ. आनंद देडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




No comments:

Post a Comment