सारा न्यूज नेटवर्क -
कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबीर संपन्न;
८५ रुग्णांची तपासणी, १३ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड..
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त मा. वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या आदेशानुसार, प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका मा. श्रीदेवी फुलारे यांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु यांच्या प्रयत्नातून व नियोजनातून आज दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात नेत्ररोग विभागाचे ६३ रुग्ण व दंतरोग विभागाचे २२ रुग्ण असे एकूण ८५ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.
शिबिरात नेत्ररोग तंत्रज्ञ राहुल शिंदे व दंतरोग तज्ञ डॉ. सुप्रिया पाटील यांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात १३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु, स्टाफ नर्स सिद्धीकी, मोईन शेख - MPW, संगीता सावंत ANM, आशा सेविका चंद्रकला सोनवणे, अश्विनी भालशंकर, वैजयंती कांबळे, सोनाली गाडे, रुकसाना इनामदार, सोहेल अरब - पुरुष कर्मचारी, सौ. सपना जाधव - स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शिबिरात तपासणी केलेल्या अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले.



No comments:
Post a Comment