सारा न्यूज नेटवर्क -
राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागामार्फत मागील ७ महिन्यात रुपये १०.५८ कोटीचा विक्रमी मुद्देमाल जप्त..
(सोलापूर प्रतिनिधी):- राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांची मा. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. श्री सागर धोमकर साहेब, विभागीय उपायुक्त, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर व श्री. सौरभ बा. अदाटे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली दि. १८/११/२०२६ रोजी मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर, इचगाव टोल नाक्यावर, इचगावचे हद्दीत ता. मोहोळ जि. सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतूकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण विदेशी मद्याच्या २००० मिलीच्या ७१ बाटल्या व १३ बॉक्स मध्ये १८० मिली च्या ६२४ बाटल्या असे मिळून एकूण ६९५ विदेशी मद्याच्या बाटल्या, १ चार चाकी टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप वाहन व एक होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच १ जणांवर कारवाई करुन रु.११,२३,४००/- किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
माहे १ एप्रिल २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य / परराज्यातील मद्य / बनावट मद्य निर्मिती / विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ७१७०८६ ली. रसायन, ५१३१३ लि., हातभट्टी दारु, ९३४० ब.लि. परराज्यातील मद्य, ४१४३ ब.लि. देशी मद्य, ११९९ ब.लि. विदेशी मद्य, ९०७.१७ ब.ली. बिअर, १११८० ब.लि. ताडी, रिकाम्या बाटल्या ३३१४९०, बनावट बुचे १३३१६०, बनावट लेबल १५५४०० व स्पिरिट १३८०० लि. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १९४१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण २०३६ जणांवर कारवाई करुन १९५ वाहनासह एकूण रुपये १०,५८,३६,३५९/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. शिवकुमार कांबळे, दुय्यम निरीक्षक श्री. विकास थोरात, जवान श्री. आण्णसाहेब कर्चे, श्री नंदकुमार वेळापूरे, श्री आण्णासाहेब फड, श्री. पवन उगले, श्रीमती शिवानी मुढे यांनी पार पाडली आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. एस डी कांबळे करीत आहेत.
तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणा-या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात येते याची नोंद घ्यावी. मिथेनॉलयुक्त बनावट दारुमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुदेर्वी मृत्यु झाले आहे. तरी सदर प्रकारच्या विषारी दारु मुळे किडनी निकामी होणे, कामस्वरुपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यु असे गंभीर दुष्परिणाम संभवतात. तरी अश्या कुठल्याही अमिषांना बळी न पडण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे.
आवाहन :
"आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट इत्यादी तत्सम पदार्थ, द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतुक, विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment