Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 24, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



बाईक टॅक्सी पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी १ डिसेंबर रोजी सोलापूर बंद.! 

सर्व रिक्षा संघटना एकवटल्या..


सोलापूर : - सोलापूर शहरातील सर्व रिक्षा संघटनांची आज एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रिक्षाचालक व मालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीची स्थापना करण्यात आली.


या समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार नरसय्या आडम (आडम मास्तर) यांची एकमताने निवड करण्यात आली.


या बैठकीमध्ये सोलापूर शहरात सुरू असलेल्या बाईक टॅक्सीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बाईक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर होणारा परिणाम आणि रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घेता, बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.





या मागणीसाठी समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मंगळवार, दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात एक दिवसीय रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.


या आंदोलनाचा मुख्य उद्देश बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्यासाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधणे हा आहे.


सोलापूरमधील सर्व रिक्षा संघटना एकत्र आल्याने रिक्षाचालकांच्या न्याय्य हक्कांसाठी आता सामूहिक लढा उभारला जाणार आहे. सर्व रिक्षाचालक व मालकांनी या बंद आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.


आमची एकच मागणी – बाईक टॅक्सी पूर्णपणे बंद झालीच पाहिजे!


एकजूट चालकांची, ताकद कृती समितीची.!




No comments:

Post a Comment