सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार कृती समितीच्या वतीने नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचा सन्मान..
पोलीस आणि पत्रकारांमधील समन्वय अधिक दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा
सोलापूर (प्रतिनिधी) :- एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते शाल, मानाची टोपी आणि पुष्पहार देऊन यादव यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सकारात्मक संवाद राहण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सत्कार समारंभादरम्यान पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. समाजातील घडामोडी, गुन्हेगारीविषयक घटना, नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांना प्रसिद्धी देताना पोलीस प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पारदर्शक माहितीची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते, यावरही चर्चा झाली.
या प्रसंगी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ढोणे, महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी, ए.जी. न्यूजचे संपादक अंबादास गज्जम आणि नितीन करजोळे आदी उपस्थित होते.
पत्रकार कृती समितीच्या या सदिच्छा भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment