सारा न्यूज नेटवर्क -
लोकमंगल बँकेच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात संपन्न;
आ. सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते सभासद व नागरिकांचा सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी) :- मा. आ. सुभाष बापू देशमुख, दक्षिण सोलापूर यांनी लोकमंगल बँकेच्या सर्व सभासद व आपल्या मतदार संघातील नागरिक यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मित्र नगर, शेळगी, सोलापूर येथील लोकमंगल बँकेच्या शाखेत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास मा. आ. सुभाष बापू देशमुख, मनीष देशमुख, प्रा. अजयकुमार पाटील सर - जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक न्याय मंच व प्रा. दत्तात्रय बनसोडे सर आणि लोकमंगल परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सभासद, नागरिक व महिलांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकमंगल बँक नेहमीच सभासदांच्या हितासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी अग्रेसर असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- सारा न्यूज नेटवर्क, सोलापूर मा. आ. सुभाष बापू देशमुख, दक्षिण सोलापूर यांनी लोकमंगल बँकेच्या सर्व सभासद व आपल्या मतदार संघातील नागरिक यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मित्र नगर, शेळगी, सोलापूर येथील लोकमंगल बँकेच्या शाखेत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास मा. आ. सुभाष बापू देशमुख, मनीष देशमुख, प्रा. अजयकुमार पाटील सर - जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक न्याय मंच व प्रा. दत्तात्रय बनसोडे सर आणि लोकमंगल परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सभासद, नागरिक व महिलांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकमंगल बँक नेहमीच सभासदांच्या हितासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी अग्रेसर असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- सारा न्यूज नेटवर्क, सोलापूर



No comments:
Post a Comment