Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, November 20, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



📰 आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे सिद्धेश्वर नगरीत आगमन; 

उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव!


सोलापूर : - आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आध्यात्मिक वक्त्या व राजयोग शिक्षिका परम आदरणीय राजयोगिनी बी.के. शिवानी दीदी यांचे आज सिद्धरामेश्वर महाराजांच्या पावन कर्मभूमी असलेल्या ऐतिहासिक सिद्धेश्वर नगरी सोलापूर येथे आगमन झाले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत करून सन्मानचिन्ह प्रदान करत गौरवपूर्ण सत्कार केला.


बी.के. शिवानी दीदी यांनी राजयोग ध्यान, आत्मजागृती, सकारात्मक विचार, तणावमुक्त जीवन आणि मानवी मूल्यांचा संदेश आपल्या प्रेरणादायी विचारांतून देश-विदेशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना मानसिक शांतता, आत्मिक शक्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा मार्ग मिळत आहे.


आजच्या धकाधकीच्या जीवनात मनःशांती, भावनिक संतुलन, कौटुंबिक सुसंवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व त्यांच्या विचारांतून अधोरेखित होते. ‘सरल मन, सरल जीवन’ हा त्यांचा संदेश प्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण आणि आत्मिक सशक्तीकरणाची प्रेरणा देणारा आहे.


याप्रसंगी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी बी.के. शिवानी दीदी यांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि मानवकल्याणाच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला. तसेच प्रेम, शांती, सकारात्मकता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश त्यांच्या विचारांतून समाजाला मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.


सिद्धरामेश्वर महाराजांच्या पावन नगरीत बी.के. शिवानी दीदी यांचे आगमन हा सोलापूरकरांसाठी आध्यात्मिक प्रेरणेचा आणि आनंदाचा क्षण ठरला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छा व्यक्त केल्या


.

No comments:

Post a Comment