सारा न्यूज नेटवर्क -
सोशल मिडीयाचा वापर करताना लक्ष्मण रेषा आखून घ्या;
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे तरुण तरुणींना आवाहन..
पुणे (प्रतिनिधी) :- सोशल मिडीयाचा वापर करताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये यासाठी तुम्हीच - तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या. असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तरूण रूणींना केले. आहे. हडपसर येथील मगरपट्टासिटी येथील आयटी कंपन्यांसोबत परिसंवादाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, तुमच्या आजुबाजुला अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या. -पुणे पोलिसांनी ड्रग तस्करीचे मोठे रॅकेट मागील वर्षात उध्वस्त केले असून यामध्ये ३ हजार ७०० कोटी रूपयांचे ड्रग जप्त केले. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजु बाजुला असे ड्रगचा काही प्रकार आढळल्यास तुम्ही आम्हाला कळवा. पोलिस आणि नागरिकांनी मिळून मिसळून काम केल्यास अशा अवैध प्रकारांवर आळा घालण्यास मदत होईल. नुकताच येरवडा परिसरात झालेल्या तरूणीच्या खुनाच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी उपस्थिती आयटीएन्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कंपन्यांनी महिलांच्या, तरूणींच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांचे काटेकोर पालन करावे असे अवाहन केले. पोर्शे कार अपघातानंतर एका स्टैंडअप कॉमीडीअन कडून पोर्शे कारमधील आरोपी सुटल्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेताना पोर्शे अपघात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळला ते गेली आठ महिन्यापासून कारागृहात असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. त्यांना अद्यापपर्यं जामीन मिळाला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडे हडपसर परिसरातील वाहतुक कोंडी, शाळेभोवती असलेल्या टपरया, रस्त्याने फिरणारे रोडरोमीओ यांच्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आयुक्तांनी तात्काळ यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment