Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 2, 2025

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री महिला संघटना तर्फे व्याख्यानचे आयोजन..



सारा न्यूज नेटवर्क - 

 सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री महिला संघटना तर्फे व्याख्यानचे आयोजन..

 सोलापूर (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले यांच्या १९४ जयंतीच्या निमित्ताने सावित्री महिला संघटना सोलापूर महिला, शिक्षण व संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्याते लक्ष्मीकांत देशमुख (अ.भा. मराठी साहित्य संमेलन ) यांच्या व्याख्यानातून मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी ( दि ५) जानेवारी सकाळी ठीक ११ वाजता अँम्फी थीएटर हिराचंद नेमचंद वाचनालय किल्ला बागेसमोर आयोजित करण्यात आले आहे.


  या कार्यक्रमाचे संयोजक अँड सरिता मोकाशी, शकुंतला सूर्यवंशी, डॉ. नयना व्यवहारे, आदित्य भोसले, सुजाता फडतरे, स्मिता पाटील, जयंती कदम, सुमित्रा देशमुख, प्रमिला जाधव, सुनिता गायकवाड, फरजाना पठाण, लता ढेरे उपस्थित असणार आहेत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment