Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

म्हाळप्पा पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश-अण्णाभाऊ साठे नगर गुरववाडी येथे पाणीपुरवठा सुविधा पूर्ण..


सारा न्यूज नेटवर्क - 

म्हाळप्पा पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश-अण्णाभाऊ साठे नगर गुरववाडी येथे पाणीपुरवठा सुविधा पूर्ण.. 

 अक्कलकोट. गुरववाडी (प्रतिनिधी) :- समाज कल्याण विभाग  जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत दलित वस्ती अण्णाभाऊ साठे नगर, गुरव वाडी तालुका अक्कलकोट येथे पाणीपुरवठा सोयी करणे काम पूर्ण करून होऊन त्याचे जलपूजन 26 जानेवारी 2025 रोजी माननीय सरपंच सौ.लक्ष्मी माळपा पुजारी व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती उपसरपंच जगदेवी स्वामी, ग्रामपंचायत सदस्य सारिका ओंकारी, मल्लिकार्जुन इंगळगी, बसवराज देवरमनी, माजी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष रवीकिरण स्वामी. माजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी, माजी सरपंच तुकाराम विंचुरे,  



प्रमुख उपस्थितीमध्ये. सिद्धनाथ बोरगावकर,जि. प.मराठी व कन्या शाळेचे मुख्याध्यापक चौगुले सर, चव्हाण सर, गंगोडा सर, कडते सर,इत्यादी बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी केजी मकानदार साहेब,

मेजर शिवानंद फुलारी, शिवाजी रावजी, बेगेश मोती बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे नगर येथे नवीन बोअर मारला असताना तीन इंच पाणी लागला आहे अण्णाभाऊ साठे नगरचे पाणीच प्रश्न कायमच म्हटले असून श्री शिलवंत देवीच्या आशीर्वादाने तीन इंच पाणी पडला असून कायमचे पाणी प्रश्न सुटले आहे ग्रामस्थांकडून सरपंच सौ. लक्ष्मी पुजारी व माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माळप्पा पुजारी यांचे या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment