सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक यांच्या अडचणींना सोडवण्यासाठी पालकमंत्री यांचा फोन कॉल..
सोलापूर (प्रतिनिधी) :- पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन सभागृह येथे संपन्न झाली. त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक यांची टीम सुध्दा हजर होती.
त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी त्यांना येणाऱ्या विविध अडचणी विषयी चर्चा करुन माहिती दिली.
सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक यांच्या अडीअडचणी सोडवून घेण्याकरिता पालकमंत्री यांनी तात्काळ फोन करून त्यांच्या अडचणी सोडवण्यात आली आहे.
त्या बद्दल सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सर्व सुरक्षा रक्षक गार्ड यांनी पालकमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहोत.
यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अशोक कनीराम चव्हाण महाराष्ट्र शासकीय सदस्य, सुरेश नारायण पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांची कामे व अडीअडचण सोडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करून मंडळातील आणि अडचण सोडण्यासाठी पुढील कारवाई होण्यासाठी निवेदन सादर केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment