सारा न्यूज नेटवर्क
सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब,पीडित,वंचित नागरिकांच्या प्रत्येक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता आंदोलन उपोषण निवेदनच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणारी अनेक सामाजिक उपक्रम च्या माध्यमातून गरिबांचा अश्रू पुसण्याचा काम करणारी संघटना म्हणून ओळखले जात आहे. अनेक विषयावर शासन दरबारी मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या पाठपुराव्याला यश देखील आल आहे.
सोलापुरात मानव अधिकार संरक्षण संघटनेची नुकताच बैठक पार पडली त्यामध्ये 2025 नूतन वर्षाच्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला.
पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चांद साहब मुजावर, सोलापूर शहर कार्य अध्यक्ष फयाज मुल्ला, सोलापूर शहर सचिव सलीम मुजावर, शहर संघटक हारिस शेख, शहर उपसंघटक जिलानी बेग, शहर संपर्कप्रमुख मीर महमूद खान, जिल्हाध्यक्ष महिला विभाग हलीमा मीर खान. यांना ओळखपत्र नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कदरी, जिल्हा महासचिव प्रवेश मुल्ला, दुर्योधन भडकुंबे, अबू शाहिद शेख, दरवेश शेख उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment