Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 20, 2025

पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणार - मिर्झा गालिब मुजावर

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणार - मिर्झा गालिब मुजावर 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समितीच्या  पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी  दैनिक तुफान क्रांतीचे  अभ्यासू  निरपेक्ष निर्भीड  युवा संपादक यांची पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी  नुकतीच प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी  नियुक्ती केली असून  त्यांचा बेगमपूर (मोहोळ ) येथे शाल पुष्पगुच्छ व  ओळखपत्र नियुक्तीपत्र  देऊन सत्कार करण्यात आला होता यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक  मिर्झा गालिब मुजावर  बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न  दिवसेंदिवस  कठीण व जटील होत असून महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असून  राज्य सरकारला पत्रकारांचे घेणे देणे मुळीच दिसत नाही त्यामुळेच  पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या बाबतीत  आपण गंभीर असून पत्रकारांना एकत्र आणून पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांचे प्रश्न  सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे  पश्चिम महाराष्ट्र संघटक  तथा दैनिक तुफान क्रांतीचे  संपादक मिर्झागालिब मुजावर यांनी सांगितले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment