Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 23, 2025

पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार..




सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी ):- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकारी जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान शहर उपाध्यक्ष रविकांत रणदिवे  यांचा जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक सादिक शेख  जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख  शहराध्यक्ष आन्सर तांबोळी  (बी एस) यांच्या हस्ते ओळखपत्र नियुक्तीपत्र  शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 


यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर समन्वयक लक्षमन सुरवसे सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद इम्रान आत्तार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment