Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

चर्मकार समाज विरोधात आपणस्पद वक्तव्याचा जाहीर निषेध...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जाहीर निषेध.!  जाहीर निषेध.!!  जाहीर निषेध.!!!

चर्मकार समाज विरोधात आपणस्पद वक्तव्याचा जाहीर निषेध...

नदीम खान व "viral Bollywood" यूट्यूब चैनल विरोधात कठोर कारवाईची " 

" संत रोहिदास समाज सेवा संघ मावळ"," संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ "व" राष्ट्रीय चर्मकार महासंघ" यांची संयुक्त मागणी..

पुणे (प्रतिनिधी) :- चर्मकार (चांभार) समाजाविरोधात “चोर चांभार” असे अपमानास्पद आणि जातीय द्वेषाने भरलेले वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते प्रसारित करणाऱ्या “ViralBollywood” यूट्यूब चॅनलविरोधात राज्यभर तीव्र रोष उसळला आहे. या घटनेमुळे चर्मकार समाजाच्या आत्मसन्मानावर गदा आली असून, समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.


 उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सह.पोलीस अधिक्षक लोणावळा श्री.सत्यासाई कार्तिक यांना निवेदन देण्यात आले. 

 वडगाव पोलीस ठाणे, मावळ यांना निवेदन देताना चर्मकार समाज बांधव. 


कामशेत पोलीस ठाणे, मावळ यांना चर्मकार समाज बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

नदीम खान व "viral Bollywood" यूट्यूब चैनल विरोधात कठोर कारवाईची " संत रोहिदास समाज सेवा संघ मावळ व संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ, व राष्ट्रीय चर्मकार महासंघ, संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य" यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील संविधानप्रेरित व्यवस्थेमध्ये प्रत्येक समाजाच्या सन्मानाची रक्षा करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु, अलीकडेच चर्मकार [चांभार) समाजाबद्दल एक जाणीवपूर्वक अपमानकारक आणि अपमानास्पद वक्तव्य करून समाजामध्ये फूट पाडण्याचा, चिथावणी देण्याचा आणि शांतता भंग करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला आहे. 

नदीम खान या व्यक्तीने चोर चांभार" असे अत्यंत अवमानकारक आणि जातिवाचक वक्तव्य केले आहे, जे एका संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारे आहे. या वक्तव्यानंतर "VIRALBOLLYWOOD" या यूट्यूब चॅनलने या प्रकाराचे प्रसारण करून हे विषारी विधान समाजामध्ये अधिक पसरवले. या घटनेमुळे केवळ चर्मकार समाज नाही, तर इतर अनेक घटकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

तसेच, नुकत्याच घडलेल्या सैफ अली खान प्रकरणात संबंधित चॅनलची भूमिका व वृत्तीही अत्यंत एकतर्फी व चिथावणीखोर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारची माध्यमांची गैरवर्तणूक समाजाच्या ऐक्याला तडा देणारी आहे. ही घटना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 (अट्रॉसिटी कायदा) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींच्या अंतर्गत गंभीर स्वरूपाची असून, दोषीना कडक शासन होणे ही काळाची गरज आहे.

आमच्या मागण्याः

1. नदीम खान याच्यावर अट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

2. "VIRALBOLLYWOOD" यूट्यूब चॅनलला तात्काळ बंद करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

3. यापुढे समाजातील कोणत्याही घटकांविरोधात अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या व प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.

4. चर्मकार (चांभार) समाजाच्या सन्मानासाठी या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व दोर्षीना कठोर शिक्षा व्हावी.

या घटनेमुळे समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून, जर प्रशासनाने त्वरित व कठोर पावले उचलली नाहीत, तर सामाजिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यासारख्या संवेदनशील व न्यायप्रिय नेतृत्वाकडून आम्हाला तातडीने कारवाईची अपेक्षा आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment