Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, January 17, 2025

विद्युत वाहिनीवर अडकलेल्या कबूतराचा वाचवला जीव

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विद्युत वाहिनीवर अडकलेल्या कबूतराचा वाचवला जीव; 

महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य... 

सोलापूर(प्रतिनिधी) :- महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय अंतर्गत मंत्री चंडक विहार, होटगी रोड, आसरा चौक येथील समाजसेवक शोएब चौधरी यांच्या घरासमोरील विद्युत वाहिनीवर कबूतर पक्षी अडकून जीव वाचवण्यासाठी धडपडत करत होते. 


याप्रसंगाचे गांभीर्य ओळखून चौधरी साहेब यांनी ताबडतोब महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच महावितरणचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी मा.श्री. अजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ श्री. धुळाप्पा टेळे, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. सुनिल काळे, श्री. निलकंठ कांबळे, बाह्यस्तोत्र तंत्रज्ञ श्री. नितीन कोळी यांनी काही क्षणातच घटनास्थळी पोहोचून कबूतर पक्षीचे प्राण वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करून सदर पक्षीचे प्राण वाचवले. पक्षीचे प्राण वाचवण्यासाठी शोएब चौधरी, मुज्जफर चौधरी यांचे देखील योगदान लाभले. जखमी पक्ष्यावर प्रथमोपचार करून निसर्गरम्य वातावरणात सोडले.

महावितरण कंपनीमध्ये सेवा देताना ग्राहकांचे विजेच्या तक्रारीचे निवारण करत असताना, एखाद्या मूक पक्षीचे देखील प्राण वाचविण्याचे सत्कार्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घडल्याने स्थानिक नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

       सदर कार्याची दखल घेत समाजसेवक शोएब चौधरी यांनी येणाऱ्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे निश्चितच सन्मान करून कौतुक करु व सत्कार्यात सदैव खंबीरपणे पाठिशी उभे राहू असे सांगून आभार मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment