Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

PNG ज्वेलर्समध्ये चोरी करणारा, गुन्हेगार अटकेत÷ त्याचेकडून 71.5 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी असा 6 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..


सारा न्यूज नेटवर्क - 

PNG ज्वेलर्समध्ये चोरी करणारा, गुन्हेगार अटकेत÷

त्याचेकडून 71.5 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी असा 6 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

 सोलापूर  (प्रतिनिधी ) :-दि. 23/01/2025 रोजी सायंकाळी 07:30 वा.चे सुमारास पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स, ध्रुव हॉटेल समोर, पटवर्धन चौक, सोलापूर या नव्याने सुरु झालेल्या, सुवर्णपेढी मध्ये काम करणारा सुपरवायझरराजकुमार बिराजदार याने सुवर्णपेढीतुन 71.5 ग्रँम सोने व एक किलो चांदी, असा एकुण 6,87,000/-रु. किंमतीचा एैवज, पेढीमध्ये कोणालाही न सांगता, ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करुन, कंपनीची फसवणुक करुन, चोरुन नेले आहेतव अश्या मजकुराची फिर्याद, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे मॅनेंजर राहुल नरेश बाकळे यांनी दिली.होती सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 63/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4), 306 प्रमाणे दि. 24/01/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत व उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणारे इसमाबाबत, अत्यंत कमी कालावधीत, कौशल्याने, गोपनीयरित्या माहिती काढली. सुपरवायझर आरोपी राजकुमार बापूराव बिराजदार वय-35 वर्षे, रा. घर नं. 108, हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर, सोलापूर विमानतळासमोर, सोलापूर यास दि.24/01/2025 रोजीच सायंकाळचे सुमारास, तो चोरी केलेला एैवज विक्री करण्यासाठी जात असताना, सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. तपासणीt त्याने पु.ना.गाडगीळ या दुकानातुन चोरलेले 71.5 ग्रँम सोने (एकुण 13 नग, पिळयाच्या अंगठया) व एक किलो चांदीचा बार (पी.एन.जी असा मार्क असलेले) असा एकुण 6,87,000/-रु. किंमतीचा एैवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 तासाचे आत उघडकीस आणला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 






No comments:

Post a Comment