सारा न्यूज नेटवर्क -
अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे ३रे संयुक्ताराजे भोसले यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा;
५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
अक्कलकोट(प्रतिनिधी) :- एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून हे शक्य आहे. यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. या महाकार्यात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा असे प्रतिपादन अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे(३)रे संयुक्त्ताराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले.अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ जानेवारी,२०२५रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत राजा फत्तेसिंह महल,नवीन राजवाडा,अक्कलकोट याठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला विशेषतः युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. दिवस भरात साधारण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विशेषतःडॉक्टर हेगडेवार रक्त केंद्र सोलापुरातील पहिली एन ए बी एच नामांकन असलेले रक्तपेढी डॉक्टर आदित्य कोतवाल वैद्यकीय अधिकारी सुनील हरहरे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर केंद्र सोलापूर यांनी राजेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण स्टाफसह शुभेच्छा दिल्या.यावेळी राधा इंगळे,मंगल कुंभार,स्मिता मॅडम यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.तसेच यावेळी विमासेवा केंद्र सोलापूर येथील कार्यरत सचिन जोकारे व त्यांच्या स्टाफने एकत्रितपणे राजेसाहेबांचा फेटा बांधून,पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरा प्रसंगी सामाजिक,
औद्योगिक,राजकिय व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (तिसरे)संयुक्ताराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबिराच्या अखेरीस स्वतः श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांनीही रक्तदान केले. विविध स्तुत्य उपक्रम राबवून राजेसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.जी एस कोकळगी,निनाद प्रधान,पूजा प्रधान चौबळ, जयसिंह पाटील,अनिकेत माने आशिष कदम,सप्तेश चौबळ, शक्ति टोणे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment