Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 5, 2025

"सारा न्यूज नेटवर्क" पुणे जिल्हा प्रतिनिधी पदी दत्ताभाऊ कदम यांची नियुक्ती..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"सारा न्यूज नेटवर्क" पुणे जिल्हा प्रतिनिधी पदी दत्ताभाऊ कदम यांची नियुक्ती.. 

नजीर भाई सय्यद यांना वेटलिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल. 

महादत्त रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सत्कार संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली दोन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून,

 दत्ताभाऊ कदम यांची पुणे जिल्हा प्रतिनिधी जबाबदारी दिल्यामुळे 4/1/2025 रोजी महादत्त रिक्षा संघटनेच्या माध्यमातून दत्ताभाऊ कदम तसेच नजीर भाई सय्यद यांना वेटलिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल भेटले आहे. या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांचा रिक्षा संघटनेचे माध्यमातून सत्कार करण्यात आला. 


यावेळेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विशाल जगताप, सचिव उमेश परदेशी, खजिनदार नितीन आळृलृंली, उपाध्यक्ष नीलम मोरे प्रमुख सल्लागार भट्टू कुंभार, कार्याध्यक्ष विनोद बापू गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते रणपिसे मेजर महेंद्र साळवी, अभिमन्यू पवार, नागेश  चाबुकस्वार, विजय रोकडे आधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळेस दत्ताभाऊ कदम यांनी सारा न्यूजचे मुख्य संपादक राम हुंडारे यांचे आभार व्यक्त केले त्यांनी मोठा विश्वास ठेवून त्यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी ही जबाबदारी दिल्याबद्दल त्यांची त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment