सारा न्यूज नेटवर्क -
पोलिस मित्र असोसिएशन व वेध फौंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..
इचलकरंजी(प्रतिनिधी) :- गेली अनेक वर्षे पोलिस मित्र असोसिएशन व वेध फौंडेशन यांच्या संयुक्तपणे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला राज्याध्यक्ष तथा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून व राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे यांच्या सहकार्याने विधायक सामाजिक उपक्रम म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र दिनानिमित्त अंगणवाडी पासून ते हायस्कूल पर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येत आहे.यावेळी शहापूर येथील विशाल हायस्कूल व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष तथा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे, राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे,उपाध्यक्ष सरस्वती हजारे, सचिव संगीता रुग्गे,स्वाती जाधव, मीनाक्षी पाटील व गुलबशा बागवान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जिलेबी वाटप करण्यात आली.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप संकपाळ व सहायक शिक्षक वसंत कुवर यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे व राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर सहायक शिक्षिका सुरेखा कदम यांच्या हस्ते महिला राज्याध्यक्ष तथा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हायस्कूलच्या सहायक शिक्षिका आशा देशिंगे,आकांक्षा कावळे अंगणवाडी सेविका सीमा कोळी व मदतनीस रुक्मिणी नलवडे यांच्या हस्ते असोसिएशन महिला शहर अध्यक्ष आशा वाघिरे, उपाध्यक्ष सरस्वती हजारे, सचिव संगीता रुग्गे सदस्य स्वाती जाधव, मीनाक्षी पाटील व गुलबशा बागवान यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विशाल हायस्कूल व अंगणवाडी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment