सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अरुण सिडगीद्दी यांची शहर सचिव पदी निवड..
सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला जातो. या कार्यात अधिक ताकद व नवा उत्साह आणण्यासाठी समितीच्या वतीने शहर सचिव पदासाठी नवी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण सिडगीद्दी यांची शहर सचिव म्हणून निवड करण्यात आली असून या प्रसंगी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार तथा डॉ. कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते ही नियुक्ती पार पडली. या कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांनी पत्रकारिता क्षेत्रातील अरुण सिडगीद्दी यांच्या योगदानाचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वात शहरातील पत्रकारांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.
अरुण सिडगीद्दी हे पत्रकारिता क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून जनतेच्या समस्या, प्रश्न आणि सामाजिक मुद्द्यांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात एक विश्वासार्ह व सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर पत्रकार, समाजसेवक व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली. उपस्थितांनी अरुण सिडगीद्दी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्यकाळात पत्रकार सुरक्षा समितीची भूमिका अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पत्रकार सुरक्षा समितीने नेहमीच पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार केला असून अरुण सिडगीद्दी यांच्या नेतृत्वात शहर पातळीवर हा निर्धार अधिक प्रभावी होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment