Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 13, 2025

शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भक्ताना दुध वाटप...

 






सारा न्यूज नेटवर्क - 

शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भक्ताना दुध वाटप...

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहराचे आराध्य दैवत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली. तैलाभिषेकने ( यण्णीमज्जल ) यात्रेचा पहिला दिवस सुरू झाला. श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंगांना तेल आणि हळदीच मिश्रण असलेले द्रव्य लेपन केलं जातं.जवळपास २० किलोमीटर पायी चालत ६८ लिंगांची  यात्रा पूर्ण केली जाते.

सोलापूर शहराचे आराध्य दैवत श्री सिद्धरामेश्वर नंदिध्वज मिरवणूक आज सोलापूर शहरातून नंदिध्वज मिरवणूक पार पडली.या नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भाविकांना दूध वाटप करण्यात आले.

 संत कक्कया समाज अध्यक्ष जितेंद्र होटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, श्री. सुरेश कटकधोंड. श्री.संतोष बोराडे . श्री.पुंडलिक अवसरे.श्री. सूर्यकांत शेरखाने .श्री गिजप्पा कटकधोड. श्री शिवाजी नारायणकर. श्री शशिकांत कटकधोड .श्री संजीव धडके, श्री आनंद धडके .श्री रोहन अवसरे .श्री मनीष होटकर. श्री अक्षय .श्री धनराज होटकर श्री सुनील शिवशरण .श्री भाऊसाहेब शेरखाने .श्री सिद्धेश्वर शिंदे .महिला  सुनंदा इंगळे. सविता इंगळे .छाया नारायणकर .सौ मीनाक्षी अवसरे.व संत कक्कय्या समाज बांधव यांच्या हस्ते भक्तांना दूध वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी ढोर समाजातील ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व सिद्धेश्वर भक्तगण हर हर बोला सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा तरुण वर्ग देत मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

हा कार्यक्रम समाजाच्या वतीने दरवर्षी राबविला जातो सर्व भक्तगण मसाला दूध याचा आस्वाद मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेत असतात.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




 

No comments:

Post a Comment