Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

प्रभाग 26 जुळे सोलापूर मध्ये ड्रेनेजची कामे पूर्णत्वास झाल्याने नागरिकांमध्ये समाधानचे वातावरण.


 सारा न्यूज नेटवर्क - 

प्रभाग 26 जुळे सोलापूर मध्ये ड्रेनेजची कामे पूर्णत्वास झाल्याने नागरिकांमध्ये समाधानचे वातावरण.

नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या पथक प्रयत्नांना यश..

सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग 26 मध्ये हद्दवाढ झाल्यापासून ड्रेनेजची कामे अर्धवट झाली होती अनेक नगरातील नागरिक यांनी ड्रेनेजसाठी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदने सादर केलेली होती व प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून विनंती केल्या होत्या त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रभाग 26 मधील वरील नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी, रोहिणी नगर भाग एक, द्वारका नगर, उद्धव नगर भाग एक व दोन, रेणुका नगर, सुभाष शहा नगर, गुरुदेव दत्त नगर भाग एक ते सहा, रत्न मंजिरी नगर, बंडापा नगर, राऊत वस्ती, अशा अनेक नगरामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी यांना ड्रेनेज समस्या बाबत लेखी निवेदन दिले होते. त्या कामाचा इस्टिमेट महानगरपालिकेने तयार करून शासन दरबारी पाठवण्यात आला होता. शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोस्थान योजनेतून सदर कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक नगरामध्ये ड्रेनेजचे कामे सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचाच एक भाग म्हणून उद्धव नगर भाग एक मध्ये नागरिकाच्या वतीने नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हदवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये आम्ही वास्तव्यास राहण्यास असून आम्हाला ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यापासून प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकून दिली व आता प्रत्यक्ष ड्रेनेजचे काम सुरू केले असून लवकरच शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोस्थान योजनेतून अंतर्गत रस्ते करण्यात येईल व त्याचा पाठपुरावा सुरू असून अनेक कामे मंजूर आहेत असे ठोस आश्वासन दिलेले असून अशा नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले. 

तसेच 25 जानेवारी रोजी संविधान अमृत महोत्सव असल्याने प्रत्येक नगरा प्रत्येक घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरव भाषण आणि संविधान उद्देशिकेचे वाचन केले व त्याबाबत जनजागृती केली. 

त्यावेळी कोळी काका,परीट सर ,विशाल माने,राठोड साहेब,शिवा वाघमारे,मनोज गायकवाड, कोळी काकू, व इतर सदर नगरातील नागरिक उपस्थित होते व त्यांनी केलेल्या कामाबद्दल नगरसेविका सौ राजश्री चव्हाण  व सोलापूर शहर भाजपा सदस्य नोंदणी प्रमुख अनिल चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment