सारा न्यूज नेटवर्क -
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने " जागतिक महिला हिंसाचार विरोधी " पंधरवडा साजरा...
सोलापूर (प्रतिनिधी) :- निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात महिला आणि मुलींसह बालकांवर होणाऱ्या हिंसा अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंध, प्रतिसाद, पुनर्वसन आणि सुधारणाऱ्या या चार टप्प्यांवर काम केले जात आहे.याच अनुषगांने निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ‘जागतिक महिला हिंसाचार विरोधी’ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
रामवाडी येथील वस्तीमध्ये महिला हिंसाचार विरोधी अभियाना निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था कटीबद्ध आहे. बाल मजुरी, बाल विवाह, विधीसंघर्षग्रस्त मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
पालक आणि मुलांमध्ये सातत्याने एक तणाव निर्माण होताना दिसतोय, मुलांवर होणारे शारीरिक व लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. छेडछाड, व्यसनाधीनता सारख्या समस्या दिसून येतात, तसेच मुलांसोबतची क्रूर वागणूक म्हणजे मुलांना मारहाण करणे.
दरवर्षी जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडाच्या निमित्ताने १६ दिवस निर्माण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गेल्या ७ वर्षापासून निर्माण संस्था हे १६ दिवसाचे अभियान राबवत आहेत. या वर्षाची थीम आहे, महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी संघटित व्हा ! हे अभियान राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, फिल्म शो, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण, प्रशिक्षण, चर्चासत्र, रॅली आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
यावेळी या वस्तीतील महिलांनी महिला हिंसाचारविरोधी शपथ घेतली व हिंसाचार संपावा यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी महिलांनी हाताचे ठसे उमटवले.
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या प्रतिनिधी नम्रता खरात व वस्तीतील महिला उपस्थित होत्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment