सारा न्यूज नेटवर्क -
सो.म.पा. प्रशाला क्र. 1 कैम्प शाळेत राष्ट्रीय बालिका दिन साजरा;
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था यांचा संयुक्त उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका संचालित सो. म.पा. प्रशाला क्र.1 कॅम्प शाळा येथे 24 जानेवारी बालीका दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
हा कार्यक्रम घेण्यासाठी अँड देवयानी किणगी तसेच निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या सोलापूर प्रतिनिधी नम्रता खरात यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मुलींसाठी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घेण्यात आल्या. यात विजेता विद्यार्थ्याचे बक्षिसे प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी बालविवाह यावर पथनाट्य सुंदर रितीने सादर करण्यात आले.
आलेल्या मान्यावरांचे स्वागत सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सज्जन जे. आर. यांनी केले. यावेळी मा.न्यायाधीश साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मुली शिकल्या पाहिजे, स्वताच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे, उज्वल भविष्यासाठी मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. असा संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंचाटे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक जे.आर. सज्जन यांनी केले. यावेळी महिला व बालविकास विभागच्या रेश्मा गायकवाड,सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे,
MSW विद्यार्थीनी दामिनी गवते, विधी सेवा प्राधिकरणचे वकील, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खांडेकर सर, शेळके सर, कांबळे सर,शहाणे अरकेरी, भुताळे मॅडम, खरबस मॅडम यांनी काम केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment