Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे विविध मागणी करिता राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर...



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे विविध मागणी करिता

राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ विविध मागणी करिता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा.जयकुमार गोरे यांच्याकडे आज नियोजन सभागृह सोलापूर येथे निवेदन दिले आहे. 

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मजबूत करण्यासाठी कुठली योजना केली पाहिजे याची माहिती पालकमंत्री यांच्या कडे दिली आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासमवेत विविध विषयावर चर्चा करताना अशोक कनीराम चव्हाण महाराष्ट्र शासकीय सदस्य, सुरेश नारायण पवार (सोलापूर जिल्हा अध्यक्ष) सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सोलापूर, 



पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाअध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त उगले तेली मॅडम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांची कामे व अडीअडचण सोडवण्यासाठी माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करून मंडळातील अडचण सोडण्यासाठी पुढील कारवाई होण्यास निवेदन सादर करण्यात आले आहे. 

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवेदनाची दखल घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment